बाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?

World Cup : इथं भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप 2023 साठी तयारीला लागलेला असताना तिथं आता संघाची व्यवस्थापन समितीसुधा कामाला लागली आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 25, 2023, 12:39 PM IST
बाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?  title=
world cup team india who is Raghu Raghavendraa India throwdown specialist virat kohli rohit sharmas favorite

India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचा डोंगर उभा केला होता. पावसामुळे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 313 धावांचं लक्ष्य मिळालं. पण, तिथपर्यंत पोहोचण्याआधीच संघ गारद झाला.  तिथं भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा या सामन्यादरम्यान बऱ्याच गोष्टींनी क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधलं. 
 
सामना सुरु असताना बाऊंड्रीलाईनपाशी एक व्यक्ती सतत लक्ष वेधत होती. कपाळी टीळा असणारी, किरकोळ शरीरयष्टी असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि संघासोबत त्या व्यक्तीचं सतत दिसणं नेमकं काय समजावं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता आणि अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आणि 'ती' व्यक्ती कोण हे सर्वांच्याच समोर आलं. उत्तरानं अनेकजण भारावले.  

'ती' व्यक्ती कोण?

बाऊंड्रीलाईनवर असणारी ही व्यक्ती कोण? तर, या व्यक्तीचं नाव आहे राघवेंद्र. संघातील अनेक खेळाडू त्याला 'रघू' याच नावानं ओळखतात. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफपैकी हे एक मोठं आणि तितकंच महत्त्वाचं नाव. 

संघातील खेळाडूंना throwdown देण्यासाठी रघू ओळखला जातो. throwdown करत खेळाडूंना बॉलिंग टाकणारा रघू महत्त्वाचा यासाठी की, त्याच्यामुळं संघातील फलंदाजांना चेंडूचा वेग, खेळपट्टीचा प्रकार, त्यामध्ये असणारा बाऊन्स अशा गोष्टींचा सहजपणे अंदाज येतो. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून रघू संघाचा भाग आहे. टीम इंडियाचा आधार असणाऱ्यांपैकीच रघूही एक, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 

हेसुद्धा वाचा : लेफ्ट हॅण्डेड वॉर्नर अचानक अश्विनविरोधात उजव्या हाताने फलंदाजी करु लागला अन्...; पाहा Video

 

टीम इंडियासाठी थ्रोडाऊन करणाऱ्या रघूचं एकंदर काम पाहता आणि हातात ब्रश घेऊन त्याला बाऊंड्रीलाईनवर उभं असलेलं पाहता त्याला नेमका पगार किती मिळतो हा प्रश्नही अनेकांनाच पडला. कारण, भारतीय संघासोबत काम करणं ही अनेकांसाठीच मोठी बाब. तर, स्पोर्ट्सकीडानं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्य़ा वृत्तानुसार रघूचा सुरुवातीचा पगार 6 लाख रुपये इतका होता. ज्यानंतर त्याच्या पगाराचा आकडा BCCI नं तिपटीनं वाढवत 20 लाखांच्या घरात नेऊन ठेवला. आता इथून पुढं रघू तुम्हाला बाऊंड्रीलाईनवर दिसला, तर तो कोण? हा प्रश्न विचारण्यापेक्षा त्याची ओळख इतरांना नक्की सांगा.