World Cup : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ICC ने अचानक केली धक्कादायक कारवाई

Virat Kohli Gift : किंग कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करतोय. तरदुसरीकडे आज विश्वचषक स्पर्धेत भारत-दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी ICC ने अचानक धक्कदायक कारवाई केली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 5, 2023, 01:12 PM IST
World Cup : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ICC ने अचानक केली धक्कादायक कारवाई  title=
world cup Bad news for virat Kohli fans ahead of India South Africa match kohli 35th birthday celebration icc not given approval to bcci

World Cup 2023 :  आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. खरं तर सेमीफायनलमध्ये या दोन्ही संघाने आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. भारतासाठी आजचा सामना महत्त्वाचा असला तरी त्यासोबत आज त्यांच्यासाठी आजचा दिवस अधिक खास आहे. कारण भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि किंग कोहलीचा आज 35 वा वाढदिवस आहे. त्यामुळे कोहलीसाठी हा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी ईडन गार्डन्स मैदानावर खास सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आलं होतं. मात्र भारत आणि दक्षिण आफ्रिकापूर्वी ICC ने अचानक धक्कादायक कारवाई केली आहे. (world cup Bad news for  virat Kohli fans ahead of India South Africa match kohli 35th birthday celebration icc not given approval to bcci)

चाहत्यांना बसला धक्का!

भारत आणि दक्षिण आफ्रिका हा कोलकतामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. त्यामुळे कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोठा सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरलं होतं. पण या सोहळ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने पाणी फेरलं आहे. कारण या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कोहलीचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र चाहत्यांनी आपल्या लाडक्या किंग कोहलीचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. 

ICC ने काय केली कारवाई?

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) च्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ईडन गार्डन्स मैदानावर सेलिब्रेशनला परवानगी दिली नसली तरी विराट कोहलीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी चाहते सज्ज आहे. विराट कोहलीची जर्सी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सबाहेर मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. विराट कोहलीच्या वाढदिवशी जास्तीत जास्त लोकांनी विराट कोहलीची जर्सी स्टेडियममध्ये चोहूबाजूने दिसणार आहे. याशिवाय विराट कोहलीचे मास्कही मोठ्या प्रमाणात विकण्यात आले आहे. त्यामुळे अख्ख ईडन गार्डन्स स्टेडियम विराटमय होणार आहे. 

तरदुसरीकडे सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांचा विक्रम आज विराट कोहली तोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त कोलकातामध्ये जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येतं आहे. विराट कोहलीच्या 35व्या वाढदिवसानिमित्त एका चाहत्याने 35 फूट उंचीचा बॅनर बनवलं आहे. तर आज त्याच्या वाढदिवशी तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करेल अशी आशा चाहत्यांमध्ये आहे.