विराटने कानात काय सांगितलं? 'घुसखोर' जार्वो म्हणाला, 'तो बोलला की, हे बघ भावा मला...'

What Virat Kohli Said To Jarvo On Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकपमधील भारताच्या पाहिल्या सामन्यामध्येच या नकोश्या पाहुण्याने मैदानात एन्ट्री घेतल्यानंतर गोंधळ उडाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 11, 2023, 01:15 PM IST
विराटने कानात काय सांगितलं? 'घुसखोर' जार्वो म्हणाला, 'तो बोलला की, हे बघ भावा मला...' title=
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात घडलेला हा प्रकार

What Virat Kohli Said To Jarvo On Ground: भारत आज वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यामध्ये भारत अफगाणिस्तानच्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्याची चर्चा असतानाच  ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना सुरु असतानाच मैदानात आलेल्या एका नकोश्या पाहुण्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. चेन्नईच्या चेपॅक क्रिकेट स्टेडियमवर खेळवलेल्या या सामन्यात अचानक जार्वो नावाची व्यक्ती भारतीय संघाची 69 क्रमांची जर्सी घालून मैदानात आली. 

जार्वोने सांगितलं नेमक विराट काय म्हणाला

जार्वोने आधी उपकर्णधार आणि विकेटकीपर के. एल. राहुलजवळ जाऊन बोलू लागला तर राहुलने त्याला मैदानाबाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जार्वोला मैदानातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणेमधील काहीजणांनी मैदानात धाव घेतली. त्यांनी जार्वोला पकडलं अन् त्याला धक्के मारुन बाहेर काढू लागले. मात्र जार्वो मैदानातून बाहेर जाण्यास तयार नव्हता. पण त्याला बळजबरीने बाहेर ढकलत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. त्याला मैदानाबाहेर काढण्याच्या काही क्षण आधी विराट या नकोश्या पाहुण्याजवळ आला आणि त्याच्याजवळ येऊन काहीतरी बोलला. विराट नेमकं काय बोलला यासंदर्भातील अजब दावा जार्वोनं सोशल मीडियावरुन केला आहे. 

विराट काय बोलला?

सुरुवातीला मैदानाबाहेर हकलवण्यात येत असलेल्या जार्वोची समजूत काढण्यासाठी विराट पुढे आला आहे असं वाटलं. मात्र विराट त्याला काहीतरी बोलला.  विराट अखेर विराट कोहलीने त्याची समजूत घातली आणि त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं. डिनॅएल जार्व्हिस नावाने ओखळल्या जाणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मैदानामध्ये त्याने प्रवेश करण्यापासून ते बाहेर काढण्यापर्यंतचा हा व्हिडीओ असून त्याला, 'जार्वोनं वर्ल्ड भारतीय संघासाठी वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं,' अशी कॅप्शन दिली आहे. 

या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि जार्वोमधील चर्चेत नक्की काय बोललं गेलं याबद्दलचा दावा करण्यात आला आहे. 'जार्वो, भावा मला तुझे व्हिडीओ आवडतात. मात्र हे सारं लगेच थांबलं पाहिजे,' असं विराट म्हणाल्याचा दावा जार्वोनं केला आहे. त्याने तसं शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

4 वेळी केली आहे सामन्यात घुसखोरी

अशाप्रकारे जार्वोने चौथ्यांदा मैदानामध्ये घुसखोरी केली आहे. यापूर्वी त्याने ब्रिटनमधील भारताच्या कसोटी सामन्यात अशी घुसखोरी केलेली. 28 ऑगस्ट 2021 रोजी जार्वो पहिल्यांदा चर्चेचा विषय ठरलेला. तो पॅड, ग्लोज, हेल्मेट घालून फलंदाजी करण्यासाठी भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात शिरलेला. तेव्हाही त्याला धक्के मारुन बाहेर काढण्यात आलं होतं.