हार्दिक पांड्या उर्वरित वर्ल्ड कप खेळणार नाही? इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाईट बातमी समोर!

Hardik Pandya injury update : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (IND vs NZ) त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता त्याच्या दुखापतीविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Updated: Oct 25, 2023, 04:57 PM IST
हार्दिक पांड्या उर्वरित वर्ल्ड कप खेळणार नाही? इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाईट बातमी समोर! title=
hardik pandya injury World Cup 2023

Hardik Pandya, World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने जबरदस्त सुरूवात केली आहे. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या तगड्या संघांना लोळवून टीम इंडिया सेमीफायनलच्या (India's Semifinal qualification scenario) दिशेने वाटचाल करत आहे. कॅप्टन रोहितपासून बाकी सर्व खेळाडू वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. अशातच आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जायबंदी झालाय. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन देखील वाढलंय. हार्दिक पांड्या याला बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (IND vs NZ) त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता त्याची हेल्थ अपडेट समोर आली आहे.

टीम इंडियाने आत्तापर्यंत पाच सामने खेळले आहेत. तर चार सामने बाकी आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं अर्ध काम बाकी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता हार्दिक पांड्या आगामी दोन सामने खेळणार नसल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धचा होणारा सामना आणि त्यानंतर मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळणार नाही. तर त्यानंतर 5 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पांड्या खेळण्यासाठी मैदानात उतरेल, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे वैद्यकीय पथक त्याच्या बरं होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करेल. शेवटच्या दोन सामन्यांसाठी पांड्या खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास टीम मॅनेजमेंटला आहे.

हार्दिक पांड्या जायबंदी

हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध डावातील 9 वी ओव्हर टाकण्यासाठी आला होता. त्यावेळी लिटन दासने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर लिटल दासने स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पांड्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला अन् तो घसरला. त्यावेळी त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रोहित शर्माला टीममध्ये मोठे बदल करावे लागले होते. पांड्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमीला संघात जागा मिळाली तर बॅटिंग ऑर्डरमध्ये सूर्यकुमार आणि इशान यांची आदलाबदल झाल्याचं पहायला मिळालं होतं.

आगामी सामन्याचं वेळापत्रक

29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.