बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय करिअरमधील 48 वं शतक ठोकलं आहे. एकीकडे विराट कोहलीच्या रेकॉर्डचं कौतुक केलं जात असताना, दुसरीकडे त्याच्यावर टीकाही होत आहे. तसंच विराटने षटकार ठोकण्याआधी गोलंदाजाने टाकलेला एक चेंडू बाहेर जात असतानाही अम्पायरने वाईड दिला नसल्याने वाद निर्माण झाला आहे. विराट कोहलीला आपलं शतक ठोकण्यासाठी तीन धावांची गरज असताना संघाला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. यावेळी गोलंदाजाने चेंडू बाहेरच्या बाजूला टाकलेला असतानाही अम्पायरने वाईड न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विराटला शतक पूर्ण करता यावं यासाठीच अम्पायरने वाईड दिला नाही असा आरोपही करण्यात आला.
नसूम याने डाव्या स्टम्पकडे टाकलेला चेंडू हा विकेटकिपरच्या हातात गेला. दरम्यान विराटने यावेळी स्टम्पच्या दिशेने थोडी हालचाल केली होती. यामुळे चेंडू बाहेरच्या दिशेने जात असतानाही अम्पायर रिचर्डने वाईड दिला नाही. यानंतर विराटने 42 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केलं आणि संघालाही विजय मिळवून दिला.
या सामन्याचं विश्लेषण करताना पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी अम्पायर रिचर्ड यांनी वाईड न देत चूक केल्याचं म्हटलं. सोबतच यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. अशा लोकांकडे करण्यासारखं काहीच नाही, असे लोक अशा मूर्ख गोष्टींसह जगतात असं वसीम अक्रम म्हणाला आहे.
"मला वाटतं ही एक चूक होती. तो नक्कीच वाईड बॉल होता. पण हा वाद त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे करण्यासारखं काही नाही. जे या अशा फालतू वादांसह जगतात आणि मग त्यावरुन पेटून उठतात," अशा शब्दांत वसीम अक्रमने वादाला पूर्णविराम दिला.
Was that a wide? #RichardKettleborough's decision of not ruling it a wide ignites a debate among cricket fans. Let's hear what our experts' take is on the decision.#ASportsHD #ARYZAP #CWC23 #ThePavilion #ShoaibMalik #MoinKhan #FakhreAlam #MisbahulHaq #INDvBAN #WasimAkram pic.twitter.com/nnfYxMclrl
— ASports (@asportstvpk) October 19, 2023
या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिकही सहभागी झाला होता. त्याने यावर आपलं मत मांडताना सांगितलं की, "विराटच्या फक्त पायांची हालचाल झाली होती. जेव्हा गोलंदाज चेंडू हातातून सोडतो आणि फलंदाज आपली जागा बदलतो तेव्हा वाईड नसतो. पण विराटने कोणतीही स्थिती बदललेली नव्हती. अशावेळी चेंडू स्टम्पजवळून गेला तरी वाईड असतो".
दरम्यान, गोलंदाजाने वाईड चेंडू टाकत विराटचं शतक हुकवण्याचा प्रयत्न केला. तर अम्पायरने वाईड न दिल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यावर त्यांचा सध्याचा कर्णधार नजमूल हुसेन शांतो याने प्रतिक्रिया दिली आहे. अहमदने जाणुनबुजून वाईड बॉल टाकल्याचा आरोप कर्णधार नजमूलने फेटाळला आहे. "नाही, अशी कोणतीही योजना नव्हता. ती एक साधी योजना होती. कोणत्याही गोलंदाजाचा वाईड बॉल टाकण्याचा हेतू नव्हता. आम्ही योग्य प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला," असं नजमूल