पत्नी अनुष्का शर्माच्या गाण्यावर विराट कोहलीचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

IND vs SA : भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.

आकाश नेटके | Updated: Nov 6, 2023, 02:49 PM IST
पत्नी अनुष्का शर्माच्या गाण्यावर विराट कोहलीचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL title=

World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 च्या (World Cup) 37 व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या (virat kohli) शतकाच्या जोरावर 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने आंततराष्ट्रीय साम्यनात 49 वे शतक ठोकलं आहे. वाढदिवसाच्या दिवशीच सचिन तेंडुलकरच्या (sachin tendulkar) विक्रमासोबत बरोबरी केल्याने विराटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र आता त्याचा मैदानावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. 

विराट कोहली जेव्हा मैदानावर फलंदाजी करतो तेव्हा तो त्याच्या फटकेबाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करत असतो. तर फिल्डिंग करत असतानाही विराट कोहली मैदानावर आनंदात असतो. मैदानावर नाचून विराट त्याचा आनंद व्यक्त करत असतो. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही विराटच्या डान्सची झलक पाहायला मिळाली. सामना सुरु असताना विराट कोहलीने पत्नीच्या एका चित्रपटातील गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली. 

विराट कोहली त्याच्या चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेकदा मैदानावर नाचू लागतो, ज्यामुळे चाहत्यांचेही मनोरंजन होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघाने 77 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. दरम्यान, विराट कोहलीने पत्नीच्या 'बँड बाजा बारात' या चित्रपटातील Envy Envy लूट गया हे गाणे ऐकल्यावर तो मैदानात नाचू लागला. विराटच्या या डान्सचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीने 101 धावांची खेळी केली. विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 वे शतक पूर्ण केले आणि यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. विराट कोहलीचे 2023 मधील हे पाचवे शतक आहे. 2023 च्या विश्वचषकातील हे त्याचे दुसरे शतक आहे. तसेच आयसीसी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 12 वेळा आयसीसी टूर्नामेंटमध्ये हे विजेतेपद पटकावले आहे.