नॉटिंगहॅम : वर्ल्डकप मधील दुसरी मॅच वेस्ट विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळली जाणार आहे. वेस्टइंडिजने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅचला ट्रेंट ब्रिज येथील नॉटिंगहॅम येथे खेळण्यास सुरुवात झाली आहे.
Toss news from Trent Bridge!
West Indies skipper #JasonHolder wins the toss and elects to bowl. #WIvPAK LIVE https://t.co/YTelzKYwRl pic.twitter.com/9JlmYDoJ6Y
— Cricket World Cup (@cricketworldcup) May 31, 2019
आतापर्यंत उभयसंघात एकूण १३३ वनडे मॅच खेळल्या गेल्या आहेत. यापैकी वेस्टइंडिजने ७० मॅचेस जिंकल्या आहेत. तर पाकिस्तानला ६० मॅचेस जिंकण्यास यश आले आहे. तर ३ मॅचेस या टाय झाल्या आहेत.
लाईव्ह स्कोअरकार्डसाठी क्लिक करा
पाकिस्तानच्या तुलनेत वेस्टइंजिडची टीम तगडी आणि मजबूत आहे. वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट चाहत्यांना आजच्या मॅचमध्येही त्याच प्रकारची कामगिरी अपेक्षित असणार आहे.
पाकिस्तानला वर्ल्डकपच्या सराव सामन्यात नवख्या अफगाणिस्तान कडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तान टीमवर वर्ल्डकपची विजयी सुरुवात करण्याचा दबाव असेल.
वेस्टइंडिज टीम : ख्रिस गेल, शाय होप (विकेटकीपर), डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, जेसन होल्डर (कॅप्टन), कालरेस ब्रॅथवेट, ख्रिस गेल, इव्हिन लेविस, शाय होप, कालरेस ब्रॅथवेट, अॅश्ले नर्स, शेल्डन कॉट्रेल आणि ओशेन थॉमस
पाकिस्तान टीम : इमाम-उल-हक, फखर झमान, बाबर आझम, हॅरिस सोहेल, मोहम्मद हफीझ, सरफराज अहमद (कॅप्टन&विकेटकीपर), इमाद वसिम, शादाब खान, हसन अली, मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ