नॉटिंगघम : टीम इंडियाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 16 जूनला मॅच रंगणार आहे. सततच्या पावसामुळे आतापर्यंत 4 सामने रद्द करावे लागले आहेत. पावसामुळे खेळपट्टी आणि मैदान झाकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाला सराव करण्यास अडथळा येत असताना आणखी एका समस्याने डोकं वर काढलं आहे.
टीम इंडियाला हॉटेलमध्ये जीमची सुविधा नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. त्यामुळे आयसीसीने टीम इंडियाला खासगी जीम मध्ये व्यायाम करण्याचे आदेश दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, त्या हॉटेलमध्ये पुरेशा सोयी नाहीत. त्यामुळे खेळाडूंना खासगी जीममध्ये जाण्यासाठी पासची सुविधा करुन देण्यात आली आहे. पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे टीम इंडियाला सराव देखील करता येत नाही आहे.
टीम इंडियाला अपुऱ्या सोयी मिळत आहे. त्यामुळे टीम इंडियाला महत्वाच्या गोष्टींसाठी हवा तेवढा वेळ देता येत नाहीये. मॅचदरम्यान फीट राहण्यासाठी खेळाडू हे दररोज जीममध्ये सराव करतात. परंतु टीममधील खेळाडूंना हॉटेलमध्येच जीमची सोय नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यँत वर्ल्डकपमध्ये 6 सामने खेळण्यात आले आहेत. या 6 पैकी 6 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड सर्वोत्तम आहे.