World Cup 2019 : चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाला २२८ रनचं आव्हान

वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.

Updated: Jun 5, 2019, 06:52 PM IST
World Cup 2019 : चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाला २२८ रनचं आव्हान title=

साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५० ओव्हरमध्ये २२७/९ एवढ्याच स्कोअरपर्यंत मजल मारता आली. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के दिले, तर मधल्या ओव्हरमध्ये चहलने ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट घेतल्या.

युझवेंद्र चहलने १० ओव्हरमध्ये ५१ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या ओव्हरमध्ये २ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला १ विकेट घेण्यात यश आलं.

दक्षिण आफ्रिकेकडून क्रिस मॉरिसने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ४२ रन केल्या, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कागिसो रबाडाने ३५ बॉलमध्ये नाबाद ३१ रन केले. मॉरिस आणि रबाडा यांच्यामध्ये ६६ रनची पार्टनरशीप झाली. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये ४ मॅच झाल्या आहेत. यातल्या ३ मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा आणि एका मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९९ आणि २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला.