World Cup 2019 : वर्ल्ड कपची सगळ्यात छोटी ट्रॉफी बघितली का?

वर्ल्ड कपच्या साखळी फेरीचा खेळ आता संपत आला आहे.

Updated: Jul 3, 2019, 11:35 PM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपची सगळ्यात छोटी ट्रॉफी बघितली का? title=

बंगळुरू : वर्ल्ड कपच्या साखळी फेरीचा खेळ आता संपत आला आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड या टीमनी सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे, तर न्यूझीलंडचा प्रवेशही निश्चित झाला आहे. वर्ल्ड कपच्या या ट्रॉफीचा मोह फक्त क्रिकेटपटूच नाही तर क्रिकेट रसिकांनाही असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बंगळुरूच्या एका क्रिकेट चाहत्याने चक्क १.५ सेंटीमीटरची वर्ल्ड कपची सोन्याची ट्रॉफी साकारली आहे.

१.५ सेंटीमीटर आकार असलेली ही ट्रॉफी बनवायला ०.४९ ग्रॅम सोनं लागलं. बंगळुरुच्या एका सोनाराने ही ट्रॉफीची प्रतिकृती बनवली आहे. नागराज रेवणकर असं या सोनं बनवणाऱ्याचं नाव आहे. ही ट्रॉफी पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी या सोनाराच्या दुकानात एकच गर्दी करत आहे. सोबतच या ट्रॉफीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.