दुबई : आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना आज दोन वेळा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स टीमशी होणार आहे. चेन्नई यंदाची आयपीएल आपल्या नावे करण्याची स्वप्न पाहतेय. मात्र केकेआरचा एक खेळाडू चेन्नईसोबत धोनीचं हे स्वप्न मोडू शकतो.
आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी एक गोष्ट चेन्नई सुपर किंग्जला फार धोकादायक ठरू शकते. कोलकाता नाईट रायडर्सचा एक खेळाडू चेन्नईला विजेता बनवण्यापासून अडथळा बनू शकतो. हा खेळाडू धोनीचा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. कोलकात्याचा हा खेळाडू म्हणजे सुनील नारायण.
कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) फिरकीपटू सुनील नारायण चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप मोठा ठरू शकतो. RCB विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात आणि दिल्लीविरुद्ध दुसरा क्वालिफायर खेळताना सुनील नारायण एक धोकादायक स्पिनर ठरला. सुनील नारयण गोलंदाजी आणि फलंदाजीने चांगली कामगिरी करतो. सुनील नारायणने आरसीबी आणि दिल्लीला पराभवाच्या गर्तेत ढकललं होतं.
कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज सुनील नारायण त्याच्या संघासाठी मॅच विनर असल्याचं सिद्ध झालं आहे. त्याने केवळ गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली नाहीये, तर पिंच हिटरची भूमिकाही त्याने साकारली आहे. यामुळेच केकेआरचा संघ आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला. यूएईच्या लेगमध्ये, सुनील नरेनने 8 आयपीएल सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत, परंतु ऑगस्ट 2019 पासून तो आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.