मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असताना अचानक रिटायर्ड हर्ट झाला. स्नायू ताणले गेल्यामुळे त्याच्या कंबरेमध्ये वेदना जाणवत होत्या यानंतर तो पवेलियनमध्ये परतला.
या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, रोहित या मालिकेत पुढे खेळू शकेल की नाही. दरम्यान या प्रश्नाचं उत्तर खुद्द कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर दिलं आहे.
या सामन्यात रोहित शर्माने 5 खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली. या सामन्यातील शानदार विजयानंतर त्याने आपल्या दुखापतीबाबतही मोठं अपडेट दिलं. तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सामन्यानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'मी ठीक आहे. पुढच्या सामन्यासाठी वेळ आहे तोपर्यंत मी पूर्णपणे तंदुरुस्त होईल याची मला खात्री आहे.
तो पुढे म्हणाला, "आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि खेळपट्टीचा चांगला वापर केला. आम्ही या लक्ष्याचा पाठलाग कसा केला हे अधिक महत्त्वाचे आहे."
सुरुवातीलाच दुखापतग्रस्त रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने शानदार खेळ दाखवला. रोहित शर्माही त्याच्या या खेळीने खूप खूश दिसत होता.
सूर्यकुमारचे कौतुक करताना रोहित म्हणाला, 'जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात कराल तेव्हा त्याचे मोठ्या डावात रूपांतर करा. या सामन्यातही सूर्यकुमारने तेच केलं. 30 आणि 40 ठीक आहेत पण जेव्हा तुम्ही 70-80 बनवता तेव्हा ते आणखी चांगले असते. त्याने अय्यरसोबत चांगली भागीदारी केली."