४८ वर्षांनी इतिहास रचणार दक्षिण आफ्रिका?

वाँडर्स स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सीरिजच्या अखेरच्या चौथ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका ४८ वर्षांनी इतिहास रचण्याच्या दृष्टीने काही पाऊले दूर आहे. आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ विकेट गमावताना ३४४वर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला ६१२ धावांचे लक्ष्य दिले. दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावताना ८८ धावा केल्या होत्या. अंधुक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवावा लागला. 

Updated: Apr 3, 2018, 11:00 AM IST
४८ वर्षांनी इतिहास रचणार दक्षिण आफ्रिका? title=

जोहान्सबर्ग : वाँडर्स स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सीरिजच्या अखेरच्या चौथ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका ४८ वर्षांनी इतिहास रचण्याच्या दृष्टीने काही पाऊले दूर आहे. आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ विकेट गमावताना ३४४वर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला ६१२ धावांचे लक्ष्य दिले. दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावताना ८८ धावा केल्या होत्या. अंधुक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवावा लागला. 

ऑस्ट्रेलिया संघासमोर आज कसोटीच्या शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी ५२४ धावा अद्याप हव्या आहेत. त्यांच्याकडे ७ विकेट शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिका संघ २-१ने आघाडीवर आहे. १९६९-७०नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर आफ्रिकेचा पहिला मालिका विजय असेल.

आफ्रिकेने चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात ३ बाद १३४वरुन केली होती. तिसऱ्या दिवशी नाबाद राहिलेल्या डीन एल्गरने ८८ धावांची खेळी केली तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने १२० धावांची तडाखेबंद खेळी केली. पॅट कमिन्सने प्लेसिसला बाद करत ही जोडी फोडली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी केली. 

पॅट कमिन्सने प्लेसिसला बाद केले. प्लेसिस बाद झाला तेव्हा आफ्रिकेच्या खात्यात २६४ धावा होत्या. दोन धावा केल्यानंतर एल्गर नॅथन लॉयनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्यांनी २५० चेंडूत १० चौकार आणि एका षटकासह १७० धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉक ४ धावा करुन बाद झाला. टेम्बा बावुमा ३५ आणि व्हर्नोन फिलँडर ३३ धावांवर बाद झाला. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिला विकेट २१ धावांवर गमावला.