कधी आणि कुठे पाहू शकाल IPL सोहळ्याचे live streaming

आयपीएलचा ११वा हंगाम सुरु होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेत. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या मुकाबल्यांना सुरुवात होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आलेय. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. सामन्यासाठी आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी असेल. हा सोहळा दीड तासांचा असेल. सामन्याच्या १५ मिनिटे आधी हा सोहळा संपेल. 

Updated: Apr 3, 2018, 11:52 AM IST
कधी आणि कुठे पाहू शकाल IPL सोहळ्याचे live streaming title=

मुंबई : आयपीएलचा ११वा हंगाम सुरु होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेत. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या मुकाबल्यांना सुरुवात होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आलेय. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. सामन्यासाठी आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी असेल. हा सोहळा दीड तासांचा असेल. सामन्याच्या १५ मिनिटे आधी हा सोहळा संपेल. 

या सोहळ्यात बॉलीवूडचे अनेक कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत. सुरुवातीला आयपीएलचा उद्घाटन सोहळा ६ एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. मात्र सीओएच्या आदेशानुसार हा सोहळा ७ एप्रिलला करण्याचे ठरवले. 

सुरुवातीला होते इतक्या कोटींचे बजेट

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट सुरुवातीला ५० कोटी रुपये ठेवण्यात आले होते मात्र सीओएच्या आदेशानंतर हे बजेट ३० कोटींपर्यंत कमी करण्यात आले होते. त्यानंतर संचालन परिषदने आता १८ कोटींचे बजेट ठेवलेय.

कधी सुरु होणार कार्यक्रम

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला संध्याकाळी ६ वाजता सुरुवात होईल. हा सोहळा दीड तासांचा असेल. मुंबई आणि चेन्नई यांच्यात टॉस होण्याआधी १५ मिनिटे आधी अर्थात सात वाजून १५ मिनिटांनी संपेल. 

कोणते कलाकार करणार परफॉर्म

उद्घाटन सोहळ्यात सुरुवातीला रणवीर सिंह येणार होता मात्र खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो येऊ शकणार नाही. त्याच्या जागी ऋतिक रोशन आणि प्रभूदेवा येत आहेत. या शिवाय जॅकलीन फर्नांडिस, परिणीती चोप्रा आणि वरुण धवनसारखे कलाकार परफॉर्म करणार आहेत. 

कुठे पाहू शकाल लाईव्ह स्ट्रीमिंग

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग संध्याकाळी साडे पाच वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर प्रसारित केले जाईल. याशिवाय इंटरनेटवर तुम्ही हॉट स्टारवर पाहू शकता.