IND vs SL 3rd ODI Probable Playing XI : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 32 धावांनी पराभव स्विकारावा लागल्याने आता टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आगामी आणि शेवटच्या वनडे सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. पहिला सामना टाय झाल्याने मालिका विजयासाठी दोन्ही सामने जिंकणे गरजेचे होते. मात्र, श्रीलंकेने दुसरा सामना जिंकल्याने आता मालिका बरोबरीत सोडवणे हेच टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा पराभव करून मालिका विजयासाठी श्रीलंका पूर्ण प्रयत्न करेल. मात्र, रोहित शर्मा यावर जालीम उपाय तयार करत आहे. रोहित शर्मा अखेरच्या सामन्यात दोन खेळाडूंना बेंचवर बसवू शकतो. यंदाच्या वनडे मालिकेत टीम इंडियासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, तो मिडल ऑर्डरचा... कोणत्याही मिडल ऑर्डर खेळाडूला दुहेरी आकडा मालिकेत गाठता आली नाही, त्यामुळे रोहित शर्मा केएल राहुल आणि शिवम दुबे यांना नारळ देऊ शकतो.
रोहित शर्मा आणि शिवम दुबे यांना जर बेंचवर बसवलं तर ऋषभ पंत आणि रियान पराग यांना संघात एन्ट्री मिळू शकते. विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत संघात येऊ शकतो. तर ऑलराऊंडर म्हणून लाड पुरवणाऱ्या शिवम दुबेला आता टाटा गुड बाय करत रियान परागला डेब्यूची संधी मिळू शकते. टी-ट्वेंटीमध्ये चमक दाखवल्यानंतर रियान परागला वनडे संघात स्थान मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
टीम इंडिया (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
श्रीलंका (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.