'सरकारनं परवानगी दिली तर इम्रानच्या शपथविधीला जाणार'

इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 

Updated: Aug 13, 2018, 06:56 PM IST
'सरकारनं परवानगी दिली तर इम्रानच्या शपथविधीला जाणार' title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू पाकिस्तान उच्चालयामध्ये पोहोचले. १८ ऑगस्टला इम्रान खान यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठीच्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सिद्धू पाकिस्तान उच्चालयामध्ये आले होते. याठिकाणी सिद्धूंनी पाकिस्तान उच्चायुक्तांची भेट घेतली. इम्रान खानच्या शपथविधीला जाण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. सरकारच्या परवानगीवरच आता सगळं अवलंबून आहे. परवानगी मिळाली तर शपथविधी सोहळ्याला जाऊ, अशी प्रतिक्रिया नवजोत सिंग सिद्धू यांनी दिली.

सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही याबद्दल माहिती दिली आहे. पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांनी सिद्धूंना फोन करून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे.

इम्रान खानला गिफ्ट म्हणून दिली बॅट

पाकिस्तानमधले भारताचे राजदूत अजय बिसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यावर चर्चा केली. यावेळी अजय बिसारिया यांनी इम्रान खाननं बॅट गिफ्ट दिली. या बॅटवर भारतीय टीमच्या सगळ्या खेळाडूंच्या सह्या होत्या.