अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11मध्ये स्थान मिळणार?

आता अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Updated: Dec 19, 2021, 03:40 PM IST
अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11मध्ये स्थान मिळणार? title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि निवड समितीने अजिंक्य रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेतलं. मात्र, रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत आता संघाचा उपकर्णधार केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान यावर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने मत व्यक्त केलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे, जो बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे.

आकाश चोप्रा म्हणतो की, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे आता सेकंड च्वॉइस उपकर्णधार नाही. भारतीय क्रिकेटमध्ये आता परिस्थिती बदलतेय." 

कु वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "केएल राहुलची भारताचा कसोटी उपकर्णधार नियुक्ती करण्यात आली आहे. मला वाटतं की राहुलला वनडेमध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं."

अजिंक्य रहाणेबाबत तो म्हणाला, "केएल राहुल उपकर्णधार असेल तर अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण होऊ शकतं. काही कसोटी सामन्यांपूर्वी तो कर्णधार होता, पण आता तो उपकर्णधारही नाहीये." 

न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत संघाचे नेतृत्व करणारा रहाणे दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. गेल्या दोन वर्षांत त्याची सरासरी 25 पेक्षा कमी आहे. या काळात त्याला फक्त एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावता आली आहेत. त्यामुळे आता विराट कोहली बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला संधी देतो की रहाणेवर विश्वास ठेवतो हे पाहणे महत्त्वाचं आहे.