रोहितच्या जर्सीवर असलेला 45 नंबर नेमका कोणाच्या आवडीचा? अखेर खुलासा झालाच

आज जाणून घेऊया धोनी, रोहित आणि विराटच्या जर्सीवर असलेल्या नंबरची कहाणी नेमकी काय आहे.

Updated: May 4, 2022, 12:14 PM IST
रोहितच्या जर्सीवर असलेला 45 नंबर नेमका कोणाच्या आवडीचा? अखेर खुलासा झालाच title=

मुंबई : जर्सीच्या मागे 10 नंबर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच सचिन तेंडुलकर किंवा लिओनेल मेस्सी येतो. खेळाडू आणि त्यांच्या जर्सीचा नंबर यामागे मोठा इतिहास आहे. सचिन तेंडुलकरने संपूर्ण कारकिर्द 10 नंबरची जर्सी घालून खेळली. तर धोनीच्या जर्सीचा नंबर 7 आहे. 

प्रत्येक खेळाडू आपापल्या हिशोबाने त्याच्या आवडीचा नंबर निवडतो. मात्र खेळाडूने निवडलेल्या प्रत्येक नंबरमागे एक कहाणी असते. तर आज जाणून घेऊया धोनी, रोहित आणि विराटच्या जर्सीवर असलेल्या नंबरची कहाणी नेमकी काय आहे.

धोनी नंबर 7

धोनीमुळे 7 नंबरची जर्सी फार लोकप्रिय झाली आहे. धोनी त्याच्यासाठी नेहमी 7 नंबरची जर्सी लकी मानतो. धोनीचा वाढदिवसाची तारिख 7 असून महिना देखील सातवा आहे. याचमुळे धोनी 7 नंबरची जर्सी परिधान करून मैदानावर उतरतो.

रोहित शर्मा 45

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी 45 नंबर फार लकी आहे. रोहित शर्माच्या आईने त्याच्यासाठी हा नंबर निवडला होता. रोहित शर्माचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. वेळोवेळी रोहित याबाबत खुलेपणाने बोलतो देखील. याचमुळे रोहित शर्माच्या जर्सीवर 45 हा नंबर दिसून येतो.

विराट कोहली 18

विराट कोहली नेहमी 18 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. या नंबरचं रहस्य त्याच्या वडिलांशी जोडलेलं आहे. विराट कोहलीच्या वडिलांचं निधन 18 डिसेंबर 2006 रोजी झालं होतं. याच कारणामुळे विराट 18 नंबरची जर्सी परिधान करतो.