मुंबई : गुजरात विरुद्ध पंजाब आयपीएलमधील 48 वा सामना झाला. या सामन्यात मयंक अग्रवालच्या टीमने 8 विकेट्सने गुजरातवर विजय मिळवला. गुजरातने आयपीएलमध्ये दुसरा सामना गमवला आहे. इंग्लिश फलंदाज लियाम लिविंगस्टोनने तुफान फलंदाजी केली. त्याने ठोकलेल्या सिक्सरकडे तर सर्वजण हैराण होऊन पाहात राहिले.
लियाम लिविंगस्टोनने 10 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 चौकार ठोकून 30 धावा केल्या. त्याने केलेली खेळी पाहून मयंक अग्रवालसह स्टेडियममधील सर्वजण पाहातच राहिले. लियामने सर्वात लांब सिक्स ठोकला आहे.
लियामने 117 मीटर लांब सिक्स ठोकला. त्याची ही कामगिरी मयंक अग्रवाल तोंडावर हात ठेवून पाहातच राहिला. लियामने 16 व्या ओव्हरमध्ये ही कामगिरी केली. त्याने शमीची चांगलीच धुलाई केली. त्याची खेळी पाहून शमी आणि मयंक अग्रवाल दोघंही हैराण झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शमीने 134.7 kph वेगानं बॉल टाकला. त्यावर लिविंगस्टोननं डीप स्क्वायर लेग करून जोरात बॅट फिरवली आणि बॉल 117 मीटर दूर गेला. आयपीएल 2022 मध्ये सर्वात लांब सिक्स ठोकण्याचा विक्रम त्याने केला आहे.
टॉस जिंकून गुजरातने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 143 धावा केल्या. पंजाबने 144 धावांचे लक्ष्य 16 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून पूर्ण केलं. शिखर धवन 62 धावांवर नाबाद राहिला तर पंजाबचा गोलंदाज कागिसो रबाडाने 4 ओव्हरमध्ये 33 धावांत 4 गडी बाद केले.
— Patidarfan (@patidarfan) May 3, 2022