T20 World Cup 2024 IND vs IRE: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आजपासून अमेरिकेत टी-20 वर्ल्डकपला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा आज पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात टीम इंडियासमोर एक मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न म्हणजे टीम इंडियाची ओपनिंग जोडी कशी असणार आहे. दरम्यान यावर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी विधान केलं आहे.
सध्याच्या घडीला टीम इंडियाकडे ओपनिंग अनेक पर्याय आहेत. यशस्वी जयस्वालने रोहित शर्मासोबत ओपनिंग केली आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीबाबतही चर्चा झाली होती. IPL 2024 मध्ये कोहलीने उत्तम फलंदाजी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ओपनर म्हणून खेळत होता. त्यामुळे रोहितसोबत ओपनिंग करण्यात कोहलीलाही संधी आहे. दरम्यान यामध्ये संजू सॅमसनचेही नाव पुढे आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात संजू ओपनिंगला आला होता.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ओपनिंगबाबत प्रतिक्रिया दिलीये. द्रविड म्हणाले, ''टीम इंडियाकडे ओपनिंगचे अनेक पर्याय आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ओपनिंगला कोण उतरणार हे ठरवणार आहोत. आम्ही आत्ता पत्ते उघडू शकत नाही. आमच्याकडे रोहितसोबत यशस्वी आणि कोहली आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये चांगली ओपनिंग केली आहे. मात्र परिस्थिती लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.
जर टीम इंडिया रोहित आणि विराट यांना ओपनिंगसाठी उतरवणार असेल तर यशस्वी जयस्वालला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. जर हे दोन्ही खेळाडू ओपनिंगसाठी मैदानात उतरले तर यशस्वीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. बांगलादेश विरूद्ध झालेल्या वॉर्म अप सामन्यात रोहित शर्मासोबत संजू सॅमसन ओपनिंगला उतरला होता.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.