IPL 2024, LSG vs CSK: शुक्रवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह लकनऊ सुपर जाएंट्सचे टेबलमध्ये 8 पॉईंट्स जमा झाले आहेत. या पराभवानंतर चेन्नईचा सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काहीसा नाराज दिसून आला.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने 82 रन्सची तर क्विंटन डी कॉकने 54 रन्सची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 134 रन्सची पार्टनरशिप केली. तर चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावलं.
यंदाच्या सिझनमधील चेन्नई सुपर किंग्जचा हा तिसरा पराभव होता. या सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, आम्ही डावाचा शेवट खूप चांगल्या पद्धतीने केला. आणखी कशाचीही अपेक्षा केली जाऊ शकत नव्हती. परंतु पॉवरप्लेनंतर आम्ही 14व्या-15व्या ओव्हरपर्यंत वेगाने रन्स करू शकलो नाही. आम्ही सतत विकेट गमावल्या आणि 10-15 रन्स कमी केले. फलंदाजी करणं थोडं कठीण आहे. काही वेळाने दव पडल्यामुळे 180-190 रन्स हा चांगला स्कोर होऊ शकला असता असं वाटलं.
कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 8 विकेट्स गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात लखनऊच्या ओपनर्सने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. चेन्नई सुपर किंग्जच्या 177 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने 6 बॉल्स बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला. लखनऊचा हा यंदाच्या सिझनमधील चौथा विजय होता.