'तुझ्या आयुष्यातील नंबर 1 व्यक्ती कोण'? महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सिक्रेट

सुरेश रैना-जडेजा नाही तर ही व्यक्ती 'नंबर 1', महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सर्वात मोठं सिक्रेट

Updated: Mar 17, 2022, 01:51 PM IST
'तुझ्या आयुष्यातील नंबर 1 व्यक्ती कोण'? महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सिक्रेट title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे सामने सुरू होण्यासाठी फक्त 9 दिवस शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याआधी धोनीनं सर्वात मोठं सिक्रेट सांगितलं आहे. कॅप्टन कूल धोनीसाठी कोण आहे नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं आहे. 

महेंद्रसिंह धोनीचे चाहते खूप आहेत. धोनीनं आपल्या चाहत्यांसोबत एक खास सिक्रेट शेअर केलं आहे. चेन्नईनं आतापर्यंत आयपीएलमध्ये चारवेळा ट्रॉफी जिंकली आहे आता पुन्हा पाचव्यांदा किताब पटकावण्यासाठी सज्ज आहे. 

आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या आयुष्यात नंबर 1 कोण आहे याबद्दल सांगितलं आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने मोठा सिक्रेट आपल्या चाहत्यांना शेअर केलं. एका चाहत्याने प्रश्न विचारला की आयुष्यात नंबर 1 स्थान कुणाला आहे. त्यावर महेंद्रसिंह धोनीनं हसला. इथे सर्वलोक जाणतात की नंबर एक कोण आहे. तुम्ही जरी तुमच्या कामात नंबर 1 असाल तरी जेव्हा घरी जाता तेव्हा नंबर एक तुमची पत्नीच असते. 

तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर सर्वजण हसत आहेत. कारण सर्वांना माहीत आहे की घरात पत्नीच नंबर 1 असते. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून धोनीच्या आयुष्यातली नंबर एक व्यक्ती ही फक्त त्याची पत्नी असल्याचं समजत आहे. 

क्रिकेटच्या मैदानात जरी जडेजा किंवा रैना खास असले तरी आयुष्यातली नंबर 1 व्यक्ती ही पत्नी असल्याचं धोनीनं सांगितलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आतापर्यंत 2010, 2011, 2018 आणि 2021 चार वेळा CSK ने ट्रॉफी जिंकली आहे. मात्र यंदा पुन्हा एकदा मुंबईचा विक्रम मोडण्यासाठी कॅप्टन कूल सेना सज्ज झाली आहे. यंदा पहिलाच सामना कोलकाता विरुद्ध होणार आहे. 10 संघ दोन टीममध्ये विभागण्यात आले असून 70 सामने एकूण होणार आहेत. यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची असणार आहे.