IPL 2024: कधी होणार आयपीएलचं वेळापत्रक जाहीर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

IPL 2024: आयपीलएचे अध्यक्ष अरूण सिंह धुमळ यांच्या माहितीनुसार, आयपीएल 2024 चा ( Indian Premier League ) सिझन भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल ( Indian Premier League ) भारतात खेळवली जाणार असल्याचं कळल्याने चाहते नक्कीच खूश असणार आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 15, 2024, 01:53 PM IST
IPL 2024: कधी होणार आयपीएलचं वेळापत्रक जाहीर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट title=

IPL 2024: येत्या मार्च महिन्यापासून आयपीएलच्या ( Indian Premier League ) 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. दरम्यान अजूनपर्यंत आयपीएलच्या सामन्यांचं शेड्यूल मात्र हाती आलेलं नाही. लवकरच बीसीसीआय ( BCCI ) आयपीएलचं शेड्यूल घोषित करणार असण्याची शक्यता आहे. दरम्यान अशातच आयपीएलच्या ( Indian Premier League ) 17 व्या सिझनचं आयोजन परदेशात केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते होती. मात्र चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

आयपीलएचे अध्यक्ष अरूण सिंह धुमळ यांच्या माहितीनुसार, आयपीएल 2024 चा ( Indian Premier League ) सिझन भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल ( Indian Premier League ) भारतात खेळवली जाणार असल्याचं कळल्याने चाहते नक्कीच खूश असणार आहेत. 

आयपीएल शेड्यूलबाबत काय म्हणाले धुमळ?

धुमाळ यांनी आयपीएलच्या शेड्यूलबाबत महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सध्या सगळीकडे निवडणूकांचे वारे वाहत असून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच 17 व्या सिझनचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. इंडियन प्रिमीयर लीग ( Indian Premier League ) भारतात व्हावी यासाठी आम्ही सरकार आणि एजन्सीसोबत काम करू.

आम्ही सगळे आगामी निवडणूकांच्या वेळापत्रकाची वाट पाहतोय. यानंतर आम्ही आयपीएलच्या ( Indian Premier League ) तारखांचं आयोजन करणार आहोत. यावेळी निवडणुकीच्या वेळी कोणतं राज्य कोणाचा सामना आयोजन करेल हे पहावं लागले. निवडणुकीच्या वेळी तशी योजना केली जाणार असल्याचं, अरूण सिंह धुमळ यांनी सांगितलंय. 

कधी सुरु होणार आयपीएलचा 17 वा सिझन?

मार्चच्या अखेरीस ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता असल्याचा खुलासाही धुमळ यांनी केलाय. धुमळ यांच्या म्हणण्याप्रमाणे, "यंदाच्या आयपीएलचा ( Indian Premier League ) सिझन मार्चच्या शेवटी सुरू होणार आहे. सगळीकडील निवडणुका एप्रिलमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही सरकारच्या मदतीने त्यावर काम करू." 

2009 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयपीएलचा दुसरा सीझन दक्षिण आफ्रिकेत पार पडला होता. त्याच वेळी, 2014 च्या निवडणुकीदरम्यान आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित करण्यात आले होते. आयपीएल 2024 ( Indian Premier League ) मध्ये चार प्लेऑफसह एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे निवडणूकांच्या तारखा लक्षात घेता आयपीएलचं शेड्यूल जाहीर करण्यात येणार आहे.