नवी दिल्ली : स्टार इंडियाने आयपीएलच्या प्रसारण अधिकार खरेदी केले आहे, यासाठी स्टारने ५ वर्षासाठी सर्वाधिक १६,३४७.५० कोटी रुपयांची बोली लावली होती. पण आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी ही रक्कम कमी असल्याचे म्हटले आहे.
मोदी यांनी ट्विट करून म्हटले की गेल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रसारणानंतर ही रक्कम जास्त असायला हवी होती.
२००९ मध्ये सोनी चॅनलने आयपीएल प्रसारण अधिकारांसाठी १.६३ अब्ज डॉलर नऊ वर्षांसाठी वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपसाठी खरेदी केले होते.
So #StarSports wins global rights for @IPL I would've hoped a larger figure Deserved greater value after 10yrs of success #IPLMediaRights pic.twitter.com/F5Gw0lVZ4b
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) September 4, 2017
वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपने बीसीसीआयने १० वर्षांसाठी आयपीएल प्रसारण हक्क मिळविले होते.
ललित मोदी सध्या लंडनमध्ये आहे. बीसीसीआयकडून त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी मन लाँड्रिंग केसमध्ये वॉन्टेड आहे.