RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम

Rajasthan royals vs sunrisers hyderabad : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला तर कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? आयपीएलचा नियम काय आहे? तुम्हाला माहिती का?

सौरभ तळेकर | Updated: May 24, 2024, 12:16 AM IST
RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम title=
RR vs SRH qualifier 2 match

IPL 2024 Final : आयपीएल 2024 च्या अखेरच्या दोन रोमांचक लढती आता बाकी आहे. दुसऱ्या क्वाफिलायर सामन्यात राजस्थान आणि हैदराबादचा संघ भिडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा 21 मे रोजी पराभव करत थेट फायनलचं तिकीट मिळवलं. त्यानंतर 22 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. अशातच आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात जो संघ जिंकेल, तो फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध भिडणार आहे. अशातच आता जर राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात पाऊस आला तर कोण फायनलमध्ये जाईल? जाणून घ्या आयपीएलचा नियम

पावसाचं विघ्न आलं तर...

प्लेऑफच्या आणि फायनल सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर, प्लेऑफचे सामने किमान पाच ओव्हर खेळवता आले नाहीत, तर सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लावला जाईल. सुपर ओव्हर टाकण्याची परिस्थिती नसेल, तर पॉइंट टेबलनुसार संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. म्हणजे ज्या संघाकडे पाईंट्स टेबलमध्ये सर्वाधिक गुण असतील तो संघ विजयी मानला जाईल. म्हणजेच जर क्वालिफार दोनमध्ये हैदराबाद आणि राजस्थान यांच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर हैदराबाद जास्त नेट रननेटमुळे फायनलमध्ये पोहोचेल. मात्र, या सामन्यात पावसाची शक्यता नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, शिमरोन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, तनुष कोटियन, डोनोवन फरेरा, नवदीप सैनी, केशव महाराज, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि कुणाल सिंग राठौर.

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन आणि आकाश महाराज सिंग.