Rohit Sharma Abuse: लाईव्ह सामन्यात 'हे' काय बोलून गेला हिटमॅन; शिवीगाळ करणाऱ्या रोहितला विराटचीही साथ, पाहा व्हिडीओ

Rohit Sharma Abuse In Live Match: रिव्ह्यू घेताना रोहित शर्माने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 5, 2024, 11:22 AM IST
Rohit Sharma Abuse: लाईव्ह सामन्यात 'हे' काय बोलून गेला हिटमॅन; शिवीगाळ करणाऱ्या रोहितला विराटचीही साथ, पाहा व्हिडीओ title=

Rohit Sharma Abuse In Live Match: केपटाऊनच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने पहिल्या टेस्टमधील पराभवाचा अखेर वचपा काढला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टेस्ट सिरीज ड्रॉ सोडवली. दरम्यान रोहित शर्मा त्याच्या फनी नेचरसाठी ओळखला जातो. दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्माची ही बाजू पुन्हा एकदा चाहत्यांच्या समोर आली आहे. 

प्रेस कॉन्फ्रेंस असो किंवा सामना लाईव्ह सुरु असो रोहित शर्मा मस्करी करण्याच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या टेस्टमध्ये फिल्डींग करताना रोहितचा असाच अंदाज पहायला मिळाला. भारतीय कर्णधाराने यावेळी लाईव्ह सामन्यात शिवीगाळ केली. मुख्य म्हणजे विराट कोहलीही त्याच्यासोबत दिसला. 

नेमकं काय घडलं?

ही घटना सामन्याच्या तिसऱ्या डावात घडली. झालं असं की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना रिव्ह्यू घेण्याची वेळ आली. यावेळी रिव्ह्यू घेताना रोहित शर्माने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फिल्डींग करतेवेळी रोहित शर्मा रिव्ह्यू घेताना शिवीगाळ करतोय. 

रोहित शर्मा रिव्ह्यू घेण्याबद्दल म्हणाला, "मी घेतो." हे वाक्य बोलून झाल्यानंतर त्या आणखी शिव्या निघाल्या. मग तो पुढे म्हणाला, "तीन-तीन रिव्ह्यू बाकी आहे." रोहित शर्माच्या बोलण्याचा उत्तर देताना विराट कोहली म्हणतो, "हां गे. काय माहिती इनसाइड एज लागली असेल." 

केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पहिला विजय

दुसऱ्या टेस्टमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने पहिल्यांदा केपटाऊनमध्ये विजयाची नोंद केली. केपटाऊन टेस्ट जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात भारताने यजमान आफ्रिकेचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतासाठी वेगवान गोलंदाज हिरो ठरले. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 6 विकेट घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने एकतर्फी 6 विकेट्स घेत सामना टीम इंडियाच्या खिशात घातला.