विराट-शुभमनची मैदानातच फुगडी... हा Video पाहून तुम्हीही म्हणालं, 'अरे, यांचं चाललंय तरी काय'

Virat Kohli Shubman Gill Dance Video: भारतीय संघाने दीड दिवसांमध्येच दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-1 च्या बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2024, 11:42 AM IST
विराट-शुभमनची मैदानातच फुगडी... हा Video पाहून तुम्हीही म्हणालं, 'अरे, यांचं चाललंय तरी काय' title=
हा व्हिडीओ होतोय व्हायरल

IND vs SA 2nd Test Virat Kohli Shubman Gill Dance: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघ मैदानावर फारच रिलॅक्स दिसला. यामागील मुख्य कारण म्हणजे या कसोटीत नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघ 55 धावांवर बाद झाला. आपल्या पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने 98 धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघचा डाव 153 वर 4 वरुन 153 वर ऑल आऊट इतक्या वाईटपद्धतीने संपल्यानंतरही भारतीय खेळाडू फिल्डींगसाठी मैदानात आले तेव्हा फारच रिलॅक्स दिसत होते.

शुभमन विराटचं सेलिब्रेशन

पहिल्याच दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला 55 वर ऑल आऊट केलं. त्यानंतर त्याच दिवशी भारतीय संघही 153 वर तंबूत परतल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा फलंदाजीला आला. त्यातही नियोजित षटकांमध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपताना यजमानांची दुसऱ्या डावातही 62 धावांवर 3 गडी गमावले होते. भारतीय गोलंदाजांनी एका दिवसात दक्षिण आफ्रिकेच्या 13 विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी दुसऱ्या डावात तिसरी विकेट घेतल्यानंतर विराट कोहली आणि सलामीवीर शुभमन गीलने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरलं.

फुगडी चर्चेत

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 45 धावांवर 3 विकेट्स असताना अचानक मैदानात विराट कोहली आणि शुभमन गील फुगडी घालू लागले. हे दृष्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांच्या या मस्तीचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी हा फारच सुंदर व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी दोन्ही खेळाडूंनी मैदानातील या कृतीने चाहत्यांना अनोखा आनंद दिल्याचंही म्हटलं आहे.

भारताची भन्नाट सुरुवात

दक्षिण आफ्रिकेकडून शेवटची कसोटी खेळणारा आणि तत्पुरता कर्णधार असलेला डीन एल्गरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय दक्षिण आफ्रिकेवरच उलटला.  नाणेफेक जिंकून यजमान संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणं महागात पडला. विकेटकीपर काएल व्हेरीन आणि मार्के यान्सन वगळता एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.  मोहम्मद सिराजने 9 ओव्हरपैकी 3 निर्धावर ओव्हर टाकल्या आणि 6 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 8 ओव्हरपैकी एक ओव्हर निर्धावर टाकली. त्याने 25 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 4 ओव्हरपैकी 1 ओव्हर निर्धाव टाकली. कृष्णाने 10 धावा दिल्या मात्र त्याला विकेट घेता आली नाही. मुकेश कुमारने 2.2 ओव्हरमध्ये एकही धाव न देता 2 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाचीही पडझड झाली. नंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 79 धावांचं आव्हान दिलं. ते भारताने 7 गडी राखून पूर्ण केलं आणि मालिका 1-1 च्या बरोबरीत सोडली.