Virat Ganguly Handshake Controversy: 15 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान या सामन्यानंतर एका गोष्टीने प्रत्येकाचं लक्ष वेधलं. ही घटना होती, ती म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एकमेकांशी हात न मिळवल्याची. दरम्यान या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. मात्र त्यावेळी या दोघांमध्ये नेमकं काय झालं याचा खुलासा दिल्ली टीमच्या कोचने केला आहे.
दिल्ली विरूद्ध आरसीबी हा सामना बंगळूरूच्या टीमने 23 रन्सने हा सामना जिंकला होता. तर या सामन्यात दिल्लीच्या टीमला सलग पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र सामन्यानंतर घडलेल्या घटनेने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली.
सामना संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हॅंडशेक करण्यासाठी आले होते. त्यावेळी विराट कॅप्टन फाफ डुप्लेसिसनंतर रांगेत मागील बाजूल होता होता. हॅंडशेक करताना विराटसमोर येताच गांगुलीने विराटशी हात मिळवणं टाळलं. इतकंच नाही तर विराटचं लक्ष नसल्याचं पाहून गांगुली देखील पुढे निघून गेला.
या संपूर्ण घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक कोच शेन वॉटसनने याबाबत खुलासा केला. द ग्रेड क्रिकेटर या पॉडकास्टमध्ये बोलताना शेन वॉटसनने दोन्ही क्रिकेटर्समध्ये नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.
शेन वॉटसन म्हणाला की, त्या अफवा देखील असण्याची शक्यता आहे. मात्र मी ठामपणाने काहीही सांगू शकत नाही. मात्र एक गोष्ट नक्की की, विराट कोहली त्यावेळी खूप संतापलेला होता. विराट ज्यावेळी हे करतो तेव्हा तो त्याच्या सर्वोत्तम कामगिरीवर असतो. मात्र यामागचे कारण काय असू शकतं, याबाबत मला माहिती नाही.
सामन्यादरम्यान देखील या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं दिसून आलं. फिल्डिंग करताना विराटने एक कॅच पकडला. त्यावेळी देखील दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेल्या गांगुलीला खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गांगुलीने विराटकडे पाहिलं नाही.