'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?

Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 21, 2024, 04:54 PM IST
'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं? title=
Kolkata Knight Riders, Manoj Tiwary, Gautam Gambhir

Kolkata Knight Riders : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता फक्त एक महिना बाकी आहे. मात्र, दोन वेळा आयपीएल (IPL) ट्रॉफी उचलणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघात सर्वाकाही अलबेल नसल्याचं समोर येतंय. श्रेयस अय्यर खेळणार की नाही? अय्यर नसेल तर कॅप्टनसी कोण करणार? असे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. अशातच आता आयपीएल तोंडावर असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) माजी खेळाडूने खळबळजनक खुलासा केला आहे. 2013 साली कोलकाता नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय झालं होतं? यावर मोठा खुलासा झालाय. 

नुकतंच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले होते. माझं करियर धोनीने खराब केलंय आणि याचा जाब मी धोनीला विचारणार, असं मनोज तिवारीने म्हटलं होतं. मनोज तिवारी 2010 ते 2013 या काळात केकेआरचा सदस्य होता. एवढंच नाही तर 2012 मध्ये केकेआरने जेव्हा आयपीएलची ट्रॉफी जिंकली, तेव्हा ड्वेन ब्रावोच्या बॉलवर विजयी चौकार मनोज तिवारीने लगावला होता. मात्र, याच केकेआरने मनोज तिवारीला संघातून वगळलं होतं. त्यावर मनोज तिवारीने मोठं वक्तव्य केलंय.

2013 ला काय झालं?

एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये त्याची गंभीरसोबत (Gautam Gambhir) मोठं भांडण झालं होतं. मात्र, ही बातमी दाबली गेली अन् कधीच ही बातमी समोर आली नाही. जर गंभीरसोबत माझं भांडण झालं नसतं तर मी आणखी काही काळ केकेआरसोबत खेळलो असतो. तसेच मला चांगले पैसे देखील मिळाले असते. पण मला याची काही फिकीर नाहीये, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. केकेआरच्या करारानुसार मला मिळणारी रक्कम वाढली असती. बँक बॅलन्स अधिक मजबूत झाला असता, पण मी याचा कधी विचार केला नाही, असं मनोज तिवारी म्हणतो.

दरम्यान, मी दिल्लीकडून खेळलो तेव्हा गॅरी कर्स्टन प्रशिक्षक होते. माझ्या डोळ्यांसमोर पाहत होतो की प्लेइंग-11 चांगली कामगिरी करत नाही. तरी देखील चांगल्या खेळाडूंना संधी दिली जात नव्हती. मी सरळ गेलो आणि म्हणालो की जर तुम्ही मला प्लेइंग-11 मध्ये ठेवू शकत नसाल तर मला सोडा. तेव्हा माझा करार २.८ कोटी रुपयांचा होता. मी असे बोललो तर ते माझा गैरसमज करून मला सोडून जातील असे कधीच वाटले नव्हते. माझ्या नुकसानीचा कधी विचार केला नाही, असं मनोज तिवारी याने रोखठोक खुलासा केला आहे.