वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, पाहा LIVE SCORE

पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीमनी कोणतेही बदल केलेले नाहीत त्यामुळे भारताच्या ऋषभ पंतला त्याच्या पहिल्या संधीची अजून वाट पाहावी लागणार आहे. 

Updated: Jul 6, 2017, 07:59 PM IST
वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, पाहा LIVE SCORE title=

किंगस्टन : पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीमनी कोणतेही बदल केलेले नाहीत त्यामुळे भारताच्या ऋषभ पंतला त्याच्या पहिल्या संधीची अजून वाट पाहावी लागणार आहे. 

पाच वनडेच्या या सीरिजमधली पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. चौथी वनडे जिंकण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. त्यामुळे सीरिज जिंकण्याची चांगली संधी भारताला आहे. 

भारतीय संघ : अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, दिनेश कार्तिक, धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी

LIVE SCORE पाहण्यासाठी इथे क्लिक करा