फक्त 2 बॉलर्स पडले भारी! 97 धावांवर संपूर्ण संघ तंबुत परतला

एका बॉलरने 5 तर दुसऱ्याने 4 विकेट्स घेऊन पूर्ण संघाला केवळ 97 धावांवर रोखलं

Updated: Jun 11, 2021, 01:43 PM IST
फक्त 2 बॉलर्स पडले भारी! 97 धावांवर संपूर्ण संघ तंबुत परतला title=

मुंबई: दोन बॉलर्सनी मैदानात धुमाकूळ घातला आणि संपूर्ण जगाला आश्चर्याचा मोठा धक्का दिला. दोन गोलंदाजांनी मिळून संपूर्ण संघाला 100 ही धावा करू दिल्या नाहीत. एकामागे एक विकेट घेऊन अवघ्या 97 धावांवर ऑलआऊट केलं. संपूर्ण संघ तंबुत परतला आणि जगभरात या दोन बॉलर्सची जोरात चर्चा सुरू झाली. 

वेस्ट इंडिज विरुद्ध  दक्षिण अफ्रिका कसोटी सामना सुरू आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पूर्ण टीम 40.5 ओव्हरमध्ये अवघ्या 97 धावा करून तंबुत परतली. याचं श्रेय केवळ दोन बॉलर्सना आहे. 

लुंगी एनगिडीने केवळ 19 धावा देऊन 5 विकेट्ल घेतल्या तर एनरिक नॉर्जियाने 35 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण अफ्रिका संघाला पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तंबुत पाठवण्यात यश आलं आहे. एनगिडीने आपल्या करियरमध्ये दुसऱ्यांदा एकाच सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. पहिल्यांदा 2018मध्ये भारत विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 5 विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम केला होता. दक्षिण अफ्रिकेनं पहिल्याच डावात उत्तम धावा करून आपलं खातं उघडलं आहे. 

विस्टे इंडिच्य़ा एका फलंदाजाला दुखापत झाल्यामुळे आता संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. दक्षिण अफ्रिके विरुद्ध सामन्यात वेस्ट इंडिजच्या 19 वर्षीय युवा गोलंदाज डन सील्सने 34 धावा देऊन 3 विकेट्स आपल्या नावावर करून घेण्याचा विक्रम केला आहे.