LIVE SCORE : भारताचं वेस्ट इंडिजपुढे १९१ रन्सचं आव्हान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं १९०/६ रन्स बनवल्या आहेत.

Updated: Jul 9, 2017, 10:58 PM IST
LIVE SCORE : भारताचं वेस्ट इंडिजपुढे १९१ रन्सचं आव्हान title=

किंग्सटन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं १९०/६ रन्स बनवल्या आहेत. भारताकडून दिनेश कार्तिकनं २९ बॉल्समध्ये सर्वाधिक ४८ रन्स बनवल्या आहेत. तर विराट कोहलीनं २२ बॉल ३९, रिशभ पंतनं ३५ बॉल ३८ आणि शिखर धवननं १२ बॉल २३ रन्स बनवल्या.

भारताचा स्कोअर २०० रन्सपर्यंत जाईल असं वाटत असतानाच भारताच्या झटपट विकेट पडल्या आणि १९० रन्सपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडिजकडून टेलर आणि विलियम्सला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या तर सॅम्युअल्सला एक विकेट घेण्यात यश आलं.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी इकडे क्लिक करा