श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाची जाहीर करण्यात आलीय. टेस्ट सिरीजसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय.

Updated: Jul 9, 2017, 10:12 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा title=

मुंबई : श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाची जाहीर करण्यात आलीय. टेस्ट सिरीजसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. विराट कोहलीकडे या टीमच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलीय, तर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल. ऑल राऊंडर म्हणून वनडे आणि टी-20मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यालाही संधी देण्यात आली आहे.

टेस्ट टीममधून शिखर धवनला डच्चू देण्यात आलाय, तर मुरली विजय, के. एल. राहुल आणि रोहित शर्माचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालंय. मुरली विजय आणि राहुल दुखापतीमुळे गेली अनेक महिने क्रिकेटपासून दूर होते. दोघांनाही आयपीएल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळता आलं नव्हतं. आता दोघंही फिट असून लंकेविरोधात खेळण्यासाठी सज्ज आहेत.

असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, रविचंद्रन अश्विन, वृद्धिमान सहा, इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दीक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद

श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक

२६ जुलै ते ३० जुलै- पहिली टेस्ट- गॅल

३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट- दुसरी टेस्ट- कोलंबो

१२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट- पल्लकेले