कोट्यवधी रुपये दूरच पण या माजी क्रिकेटपटून 2 वेळचं अन्नही मिळायचे वांदे

आर अश्विननं ट्वीट करत या क्रिकेटपटूला शक्य तेवढी मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

Updated: May 20, 2021, 05:15 PM IST
कोट्यवधी रुपये दूरच पण या माजी क्रिकेटपटून 2 वेळचं अन्नही मिळायचे वांदे title=

मुंबई: जगावर एकीकडे कोरोना महासंकटामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. आपल्या जवळच्या व्यक्ती गमवत आहेत. अशा परिस्थितीत एका क्रिकेटपटूला साधं दोनवेळचं अन्नही खायला मिळत नाही आहे. पोटभरीचं तर सोडाच किमन एकवेळची थोडी भूक शमेल एवढंही अन्न मिळण्याचे वांदे झाले आहेत. त्याची ही अवस्था पाहून टीम इंडियाचा खेळाडू भावुक झाला आणि त्याने मदतीचं आवाहन केलं आहे. 

आर अश्विननं ट्वीट करत या क्रिकेटपटूला शक्य तेवढी मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. वेस्टइंडिजचा माजी वेगवान गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन सध्या अडचणीत सापडला आहे. त्याला मदत करण्याचं आवाहन आर अश्विननं केलं आहे. 

वेस्टइंडिजचा माजी घातक गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन सध्या भयंकर आर्थिक कचाट्यात सापडला आहे. त्याला भूक शमवण्याइतकही दोन वेळचं अन्न मिळत नाही. क्रिकेट समीक्षक भारत सुंदरसन यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यांच्या या ट्वीटनंतर रविचंद्र अश्विन खूप भावुक झाला. 

पॅटरसन सध्या अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. त्याच्याकडे घरात धान्य भरण्याइतकेही सध्या पैसे नाहीत. पॅटरसननं 1986 मध्ये टेस्ट डेब्यू केला होता. वेस्टइंडिजकडून त्यांनी 28 टेस्ट सामने खेळून 93 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय 59 वन डे सामने खेळले असून 90 विकेट्स त्यांनी आपल्या नावावर केल्या होत्या.

'दादाशी पंगा तर...' सौरव गांगुली यांनी युवा क्रिकेटरला अशा शिकवला धडा

 पॅटरसनच्या घातक गोलंदाजीसमोर फार कमी फलंदाज टिकायचे. याच याच माजी गोलंदाजी ही अवस्था पाहून अश्विन भावुक झाला आणि त्याने मदतीचं आवाहन केलं.