मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार; हार्बर मार्गावरुन पश्चिम उपनगरात पोहोचणे होणार सोप्पं

Mumbai Metro 2B: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो दाखल होणार आहे. यामुळं हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम उपनगरात येणे सोप्प होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 13, 2024, 12:07 PM IST
मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार; हार्बर मार्गावरुन पश्चिम उपनगरात पोहोचणे होणार सोप्पं title=
First phase of Metro 2B will be operational by December 2025

Mumbai Metro 2B: मुंबईकरांचा प्रवास सुखकर व आरामदायी होण्यासाठी प्रशासन मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे मेट्रोमुळं प्रवासाचा वेळ तर वाचत आहे पण लोकलमधील गर्दीदेखील कमी होते. आता आणखी एक मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. एमएमआरडीएकडून डी.एन.नगर ते मंडाळे मेट्रो 2ब मार्गिकेचा चेंबूर डायमंड मार्केट ते मंडाले हा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो. त्यासाठी मानखुर्द येथील उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी गर्डर उभारण्याचे काम MMRDAकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळं लवकरच ही मेट्रो सुरू होऊ शकते. 

मानखुर्द येथील रेल्वे मार्गिकेवरुन मेट्रो 2ब मार्गिका जाणार आहे. मंडाले डेपो आणि चेंबूरदरम्यान ही मार्गिका आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यात येणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्गिकेचे दोन भागात विभाजन करण्यात आलं आहे. 2A आणि 2B हा मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर आणि अंधेरी पश्चिम डीएन नगर ते मंडाले डेपो असा आहे. मेट्रो लाइन 2B ची लांबी 24 किमी असून या मार्गावर 20 स्थानके असणार आहेत. या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी इतका असणार आहे. 

डीएन नगर येथील ईएसआयसी वसाहत ते मंडाले मेट्रो 2B मार्गिका ही मेट्रो 2A मार्गिकेचा विस्तार आहे. मेट्रो 2B प्रकल्पामुळं पूर्व उपनगरातून थेट दहिसरपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम उपनगरात येणे सहज शक्य होणार आहे. मात्र हा मार्ग सुरू होण्यासाठी जून 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मेट्रो 2B चं काम 60 टक्के पूर्ण झालं आहे. 

मेट्रो 2B वर अशी असतील स्थानके

ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला (पू), ईईएच चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो अशी स्थानकं या मार्गावर असणार आहेत. मेट्रो 2Bचा डेपो मंडाला येथे असणार आहे.