Rohit Sharma : आम्ही जिंकलो असतो पण...; पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित निराश

मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाला सामोरं जावं लागलंय. 3 विजयानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्शदिपनेने शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली.

Updated: Apr 23, 2023, 04:41 PM IST
Rohit Sharma : आम्ही जिंकलो असतो पण...; पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित निराश title=

Rohit Sharma : शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab kings) यांच्यामध्ये सामना रंगला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंच रंगलेल्या या सामन्यात अखेर पंजाबचा 13 रन्सने विजय झाला. 215 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या टीमने चांगली सुरुवात केली. मात्र सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांची विकेट गेल्यानंतर मुंबईच्या इतर फलंदाजांना विजय मिळवून देता आला नाही. दरम्यान या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झालेला दिसून आला. 

मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाला सामोरं जावं लागलंय. 3 विजयानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्शदिपनेने शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. 20 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढत पंजाबला विजयाच्या वाटेवर आणलं. 

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, माझी थोडी निराशा झाली. आम्ही हा सामना जिंकलो असतो पण मैदानात आम्ही काही चुका केल्या. मात्र त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंना मनोबल टिकवून ठेवायला आम्ही सांगणार आहोत. आम्ही आतापर्यंत सहा सामने खेळलो असून तीन जिंकले आहेत. तर 3 सामन्यांमध्ये आम्हाला पराभवाचा सामना करावा लागलाय. आणि तीन हरले आहेत. आयपीएल संपण्यासाठी बराच वेळ शिल्लक असून आम्हाला स्पर्धात्मक राहण्याची गरज आहे. 
 
रोहित शर्मा पुढे म्हणाला, सूर्या आणि ग्रीन या दोघांनीही चांगली फलंदाजी केली. त्यांनी शेवटपर्यंत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली, असंही रोहित शर्मा म्हणाला. 

सूर्या आणि ग्रीनची तुफान खेळी

सूर्या क्रीजवर असताना मुंबई जिंकणार अशी शक्यता दिसून येत होती. सूर्याने 26 बॉल्समध्ये 57 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 3 सिक्सेसचा समावेश होता. तर ग्रीनने 43 बॉल्समध्ये 67 रन्स केले. मात्र ग्रीनची विकेट गेल्यानंतर सूर्याची कॅच आऊट झाला. यानंतर पुढील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही.