Rohit Sharma : एशिया कपच्या ( Asia cup 2023 ) दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने या स्पर्धेमध्ये सुपर- 4 चं तिकीट देखील पक्क केलं. दरम्यान यामुळे भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. अशामध्येच नेपाळविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाची ( Team India ) खराब फिल्डींग दिसून आली. ज्यावरून टीम इंडियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. टीम इंडियाच्या या फिल्डींगवर कर्णधार रोहित शर्मानेही ( Rohit Sharma ) भाष्य केलं आहे.
नेपाळविरुद्ध टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाज आणि फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट झालेली दिसून आलं. मात्र नेपाळविरुद्ध टीम इंडियाची फिल्डींग अत्यंत खराब झाली. यावेळी टीममधील सर्वोत्तम खेळाडूंनी अनेक सोपे कॅच सोडले. यामुळे सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चांगलाच संतप्त दिसला.
नेपाळ विरूद्धचा सामना 10 विकेट्सने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये बोलताना म्हणाला, सुरुवातीला मी काहीसा नर्व्हस होतो. मात्र त्यानंतर मी एकदा खेळायला सुरुवात केली आणि खेळत राहिलो. गेल्या सामन्यात आम्हाला फलंदाजी तर या सामन्यामध्ये गोलंदाजीची संधी मिळाली. ही आमच्या तयारीसाठी खूप चांगली गोष्ट आहे.
या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंनी सोपे कॅच सोडले. यासंदर्भात बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, सुपर 4 मध्ये आम्ही अजून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यात 4 विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने इशान आणि हार्दिकने फलंदाजी केली, ती खूप चांगली होती. नेपाळविरूद्ध आम्ही ठीक-ठाक गोलंदाजी केली, मात्र आम्ही त्याहून चांगली फलंदाजी करू शकलो असतो. पण अशा फिल्डींगसोबत आम्ही वर्ल्डकप काय एशिया कपमध्येही जाऊ शकत नाही.
आशिया कप 2022 ( Asia cup ) मध्ये देखील टीम इंडिया सुपर 4 मध्ये पोहोचली होती. परंतु 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी देखील टीम इंडियाला सुपर 4 मध्ये 3 सामने खेळायचे आहेत. जर टीमला अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर टीम इंडियाला किमान 2 सामने जिंकणं गरजेचं आहे.