वीरेंद्र सेहवागने या हटके स्टाईलमध्ये दिल्या झहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय गोलंदाज झहीर खान आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: Oct 7, 2017, 06:26 PM IST
वीरेंद्र सेहवागने या हटके स्टाईलमध्ये दिल्या झहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा  title=

मुंबई : भारतीय गोलंदाज झहीर खान आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

झहीरच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

झहीरचा जुना सहकारी वीरेंद्र सेहवागनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना त्याने झहीरचे एक खास 'निकनेम' देखील आपल्यासमोर आणले आहे.  

शुभेच्छा देताना सेहवाग म्हणाला, ' भारताच्या उत्तम गोलांदाजांपैकी एक असलेल्या आणि तल्लख मेंदूच्या 'ग्यान बाबा' झहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सोबतच हा लग्नापूर्वीचा शेवटचा वाढदिवस असल्याचीही आठवण वीरूने त्याला करून दिली आहे.  

२०१७ च्या अखेरीपर्यंत झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे लग्नबंधनात अडकणार आहेत. 

झहीर खान हा उत्तम डावखुरा गोलंदाज आहे. २००३,२००७ आणि २०११ मध्ये झहीर खानने उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर २०१५ साली झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.