Virender Sehwag Predict Future: गेल्या काही वर्षांत वनडे (ODI) आणि टेस्टपेक्षा (Test cricket) T20 क्रिकेटकडे (T20) चाहते जास्त आकर्षित झाले आहेत. त्यामुळे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मागे पडताना दिसतोय. त्यामुळे आता टेस्ट आणि वनडेचं कसं होणार? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट दोन्ही टिकून राहतील, असा विश्वास भारताचा माजी महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag ) व्यक्त केला आहे.
फक्त T20 क्रिकेट (T20 Cricket) हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, हे मला मान्य नाही. आयसीसीच्या (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बहुतेक देश खेळणार असल्यानं कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट देखील कायम राहील, असंही विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला आहे.
माझ्या मते क्रिकेट खेळण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कारण तुम्ही देशासाठी खेळला नाही तरी चालेल. पण तुम्ही T20 लीग खेळून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात, असं सेहवाग म्हणाला आहे.
आणखी वाचा - PAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?
दरम्यान, नुकताच टी-20 वर्ल्ड (T-20 World Cup 2022) कप पार पडला असून आता सर्वांना 2023 च्या वनडे वर्ल्ड कपची आतुरता आहे. कारण 2023 साली होणारा वनडे वर्ल्ड कप हा भारतात पार पडला जाणार आहे. आता कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेशच्या (India vs Bangladesh) दौऱ्यावर आहे. त्याचवेळी विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.