विराट कोहलीनं स्वत: डिझाईन केले बूट, पाहा काय आहे किंमत

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं आज स्निकर हे बूट लॉन्च केले.

Updated: Oct 18, 2018, 05:30 PM IST
विराट कोहलीनं स्वत: डिझाईन केले बूट, पाहा काय आहे किंमत  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं आज स्निकर हे बूट लॉन्च केले. हे बूट मी स्वत: डिझाईन केले असल्याचं विराट म्हणाला. विराटनं ट्विटरवर ही माहिती दिली आहे. १०० टक्के क्लासिक, १०० टक्के मी! असं विराट या ट्विटमध्ये म्हणाला आहे. मी आज बास्केट क्लासिक वन ८ लॉन्च करत आहे. मी डिझाईन केलेलं हे पहिलं स्निकर आहे आणि हे सोपं आहे. थोडसं क्रिकेट आणि कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी हे योग्य आहे. ज्या पद्धतीनं मी याच्यावर प्रेम करतो! तुम्ही काय विचार करता?, असं विराटनं विचारलं आहे.

विराट कोहलीच नाही तर अभिनेत्री सोनम कपूरचा पतीही स्निकरचा फॅन आहे. आनंद आहुजानं २०१६ साली भारतात पहिला मल्टी ब्रांड स्नीकर बुटीक वेजनॉनवेज लॉन्च केलं होतं. स्नीकरबद्दलचं प्रेम आनंद आहुजा नेहमीच इन्स्टाग्रामवरून दाखवत असतो. एवढच नाही तर आनंद लग्नामध्येही सिल्व्हर रंगाचं स्निकर घालून आला होता. यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.

शाहरुख खान, करीना कपूर, जान्हवी कपूर हेदेखील यांनीही त्यांचं स्निकर प्रेम वारंवार दाखवलं आहे. विराट कोहलीनं डिझाईन केलेल्या या बुटांची किंमत आहे ५,९९९ रुपये.