टीम इंडियाशी पहिल्यांदाच विराटचा विरह...का म्हणतोय? ''हे नेहमीच...''

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठीही संघ जाहीर केला असून विराट कोहली या संघाचा भाग नसणार आहे.

Updated: Nov 10, 2021, 02:26 PM IST
टीम इंडियाशी पहिल्यांदाच विराटचा विरह...का म्हणतोय? ''हे नेहमीच...'' title=

मुंबई : विराट कोहलीने भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलंय. त्याच्या जागी रोहित शर्माला T20 टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जाणार्‍या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठीही संघ जाहीर केला असून विराट कोहली या संघाचा भाग नसणार आहे.

टीमच्या घोषणेनंतर, बुधवारी कोहलीने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह उर्वरित सपोर्ट स्टाफचे आभार मानण्यासाठी एक खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये की, "एक संघ म्हणून अद्भूत प्रवासासाठी आणि सुंदर आठवणींसाठी सर्वांचे आभार. तुमच्या सर्वांचं योगदान अतुलनीय होतं आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ते नेहमीच लक्षात ठेवलं जाईल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा."

T20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताची मोहीम संपल्यानंतर, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह उर्वरित सपोर्ट स्टाफनेही टीम इंडियासोबतचा प्रवास संपलाय. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच शास्त्री यांनी पुन्हा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नसल्याचं जाहीर केलं होतं. 

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या जागी रवी शास्त्रीची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेपासून द्रविड संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.

T20 वर्ल्डकपमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याने हार्दिक पांड्यालाही संघातून वगळण्यात आलं आहे. तर दुसरीकडे युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचं संघात पुनरागमन झालंय.

रोहितची नियुक्ती ही केवळ औपचारिकता होती तर लोकेश राहुल टी-20 फॉरमॅटमध्ये उपकर्णधार असेल. विराट कोहलीशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.