इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा 'हा' बॅट्समन सर्वाधिक धावा करणार, Monty Panesar चा दावा

 टीम इंडिया (Team India)  लवकरच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. 

Updated: May 28, 2021, 09:20 PM IST
इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा 'हा' बॅट्समन सर्वाधिक धावा करणार, Monty Panesar चा दावा title=

मुंबई : टीम इंडिया (Team India)  लवकरच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. या दौऱ्यात (IND vs NZ) भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंजिक्यपदासाठी (ICC World Test Championship Final) दोन हात करणार आहे. तर यानंतर 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार (Virat Kohli)  विराट कोहली सर्वाधिक धावा करेल, असा दावा इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने (Monty Panesar) केला आहे.पानेसरने इंडिया टुडेला मुलाखत दिली या दरम्यान त्याने हा दावा केला. (Virat Kohli will be the highest run scorer in the Test series against England says former England cricketer Monty Panesar)

टीम इंडिया ही कसोटी मालिका 5-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, अशीही भविष्यवाणी पानेसरने काही दिवसांपू्र्वी केली होती. टीम इंडिया विरुदध न्यूझीलंड यांच्यात अजिंक्यपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर 4 ऑगस्टपासून या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.   

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी मॅच, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी सामना, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी मॅच, 10 ते 14 सप्टेंबर.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल आणि रिद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट बंधनकारक). 

राखीव खेळाडू : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नगवासवाला.