Virat Kohli Viral Video: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजचा शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जातोय. आजच्या सामन्याच्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांचे पंतप्रधान उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाच्या टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. अशातच ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली (Virat Kohli) स्लिपमध्ये उभा असून काहीतरी बकाबका खाताना दिसतोय. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यवर चाहते, विराट स्लिपमध्ये उभा राहून पोटोबा करत असत असल्याचं म्हटलंय.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन मैदानावर फलंदाजी करत होता. यावेळी लाबुशेन त्याचं गार्ड घेत होता. यावेळी विराट कोहली सेकंड स्पिलमध्ये उभा राहून काहीतरी खाताना कॅमेरात कैद झाला. मुख्य म्हणजे, यावेळी कॅमेराचा फोकस लाबुशेनवर होता. मात्र मागे उभा असलेला विराट कोहली देखील फ्रेममध्ये दिसत होता.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) March 9, 2023
या व्हिडीओमध्ये विराट कोहली त्याच्या खिशातून काहीतरी काढतो आणि पटापट खाऊ लागतो. दरम्यान ही खाऊची गोष्ट दुसरी तिसरी काहीही नसून प्रोटीन/एनर्जी बार असल्याचं समोर आलं आहे.
विराटने हा प्रोटीन बार केवळ स्वतः खाल्ला नाही तर इतर सहकारी खेळाडूंनाही ऑफर केला. लाबुशेनने ओव्हरचा एक बॉल फेस केल्यानंतर खिशातून एक बार काढला आणि बाजूला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरला ऑफर केला. यावेळी अय्यरने मात्र नकार दिला, पण तरीही विराटने एक बार श्रेयसकडे फेकला. श्रेयसने हा बार न खाता खिशात ठेऊन दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाला आहे.
अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या टेस्ट सामन्यात मोठे निर्णय घेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलसह टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसणार आहे आहे. चौथ्या टेस्टमधून पुन्हा एकदा के.एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी फायदेशीर ठरल्याचंही दिसून आलं.