Virat Kohli IND vs AUS : IPL 2024 ची धूम सध्या सुरु आहे. दोन महिन्याच्या ब्रेकनंतर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून दमदार खेळी करताना दिसून येतो आहे. भारतीय क्रिकेट संघ हा विराट कोहलीशिवाय अपूर्ण म्हणायला हवं. IPL 2024 मधील पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर विरुद्ध विराट कोहलीने विराट विक्रम केला. कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करून आयपीएलच्या इतिहासात 2 संघांविरुद्ध 1000 धावा करणारा पहिला भारतीय ठरला. पण विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' का म्हणाला विराट कोहली असा आणि कोणाबद्दल म्हणाला काय आहे प्रकरण जाणून घ्या. (Virat Kohli video How can he hit me on the head I will hit him so much Virat Kohli said about whom 2014 australia tour story)
विराट कोहली एका शोमध्ये बोलत असताना हा किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, 2014 मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता. या दौऱ्यामधील पहिल्या सामान्यातील हा किस्सा आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्याच बॉलचा सामना करत होतो. जॉन्सनने बाउन्सर बॉल टाकला अन् तो थेट माझ्या डोक्याला जाऊन लागला. त्यावेळी माझ्या मनात एकच विचार आला, मला पुढील 60 दिवस या कसोटीमध्ये खेळायचं आहे आणि तेवढ्याच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यावेळी लंचपूर्वीचे दोन बॉल बाकी होते. आता या घटनेचा विचार करुन मला आनंद होतो. त्यावेळी माझ्या समोर दोन ऑप्शन होते मी खेळावं किंवा माघार घ्यावी. त्यावेळी मनात आलं त्याने माझ्या डोक्याला कसं मारलं आणि आता मी या मालिकेत एवढं रन मारेल.
“Isko mein itna maarunga naa, and that’s exactly what I did”
Kohli saab talking about the 2014 Australia tour and his battle against Mitchell Johnson pic.twitter.com/geP35IUz08
— (@wigglyywhoops) April 11, 2024
तुम्हाला 2014 ऑस्ट्रेलिय कसोटी मालिका आठवत असेल तर महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात विराट कोहली कॅप्टन होता. त्याने भारताच नेतृत्त्व करताना दोन्ही डावात शतकं ठोकलं. त्या कसोटी मालिकेत कोहलीने 8 डाव खेळले अन् त्याने 86.50 च्या सरासरीने 692 रन्स केले. यामध्ये 4 सेंच्युरी आणि एक हाफसेंच्युरी आहेत.
मात्र, ही कसोटी मालिका जिंकण्यात भारतीय अपयश आलं. भारतीय संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर 2018-19 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव करुन विक्रम रचला.