मुंबई : मुंबईवर 7 विकेट्सने मात मिळवत बंगळुरू टीमने दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये बंगळुरू टीमने उत्तम कामगिरी केली. फाफ ड्यु प्लेसीसने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात विराटची चांगली कामगिरी दिसली. मात्र कोहलीला ज्या पद्धतीनं आऊट करण्यात आलं त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सुपरस्टार किंग कोहलीनं 36 बॉलमध्ये 48 धावा केल्या. 2 धावांसाठी त्याचं अर्धशतक चुकलं. यामध्ये त्याने 5 चौकार ठोकले. बंगळुरूला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 8 धावांची गरज होती. त्यावेळी बॉलिंग डेवाल्ड ब्रेविसकडे देण्यात आली.
ब्रेविसच्या पहिल्याच बॉलला कोहलीनं डिफेन्स केला. गोलंदाजाने अपील करताच अंपायरने आऊट दिलं. कोहलीनं या बॉलचा रिव्ह्यू घेतला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. बॉल पॅड आणि बॅटला लागल्याचं रिव्ह्यूमध्ये दिसलं. त्यावेळी काहीच स्पष्टीकरण न देता थर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला.
थर्ड अंपायरने विराट कोहलीला आऊट दिलं. त्यावेळी कोहलीच्या 48 धावा झाल्या होत्या. कोहलीचं अर्धशतक हुकलं. थर्ड अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली नाराज झाला. त्याने रागात मैदानात बॅट आपली आणि त्यानंतर मैदान सोडलं.
मुंबईने पहिली बॅटिंग करत 151 धावांचं लक्ष्य बंगळुरूला दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करत बंगळुरूने 3 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. बंगळुरूमध्ये अजुन रावतने 66 धावांची खेळी केली. त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.
— Addicric (@addicric) April 9, 2022