अरेरे! स्टार खेळाडूच कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी

लाजीरवाण्या पराभवाला 3 स्टार खेळाडू जबाबदार, कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी, पाहा कोण ते खेळाडू?

Updated: Apr 10, 2022, 04:01 PM IST
अरेरे! स्टार खेळाडूच कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी title=

मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगामा खूपच चुरशीचा होत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंतची सर्वात यशस्वी टीम म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जात होतं मात्र यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचे तीन तेरा वाजले आहेत. आतापर्यंतच्या 4 सामन्यात मोठा पराभव झाला आहे. 

बंगळुरूनेही मुंबईवर 7 विकेट्सने मात केली आहे. सध्या मुंबईची टीम अत्यंत लाजीरवाणी कामगिरी करत आहे. टीममधील स्टार खेळाडूच कॅप्टन रोहित शर्माच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहेत. हे स्टार खेळाडू कोण आणि त्यांचं कुठे नेमकं चुकतंय जाणून घेऊया. 

1. कीरोन पोलार्ड 
कीरोन पोलार्ड मुंबई इंडियन्सची जान आहे. पण सध्या तोच खराब फॉर्ममध्ये आहे. बंगळुरु विरुद्ध सामन्यात त्याला आपलं धावांचं खातं उघडण्यात अपयश आलं. त्याचा खराब फॉर्म मुंबई टीमसाठी तोट्याचा ठरत आहे. 

2. मुरूगन अश्विन

भारतीय मैदानावर स्पिनर्स नेहमी फायद्याचे ठरतात. स्पिनर मुरूगन अश्विन सध्या चांगली कामगिरी करताना दिसत नाही. त्याच्या बॉलवर सध्या फलंदाज खूप धावा लुटत आहेत. बंगळुरू विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 26 धावा दिल्या. टीमसाठी तो अडचणीचा ठरत आहे. 

3. जयदेव उनादकट 

जयदेव उनादकट आपल्या गोलंदाजीनं मनं जिंकायची दूर पण कॅप्टन रोहितसाठी अडचणीचा ठरत आहे. त्याची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. बंगळुरूला त्याने 30 धावा दिल्या. पराभवाचं मोठं कारण जयदेव आहे. त्यामुळे रोहित त्याला संधी देणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिलं जातं. मुंबईने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई टीम अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. 4 सामन्यांचा निकाल तर लागला. आता पुढचे सामने जिंकण्यासाठी रोहित काय नियोजन करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.