Virat Kohli got angry on Shakib Al Hasan : टीम इंडियाचा (Team India) खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने आज तिसऱ्या वनडे (IND vs BAN 3rd ODI) सामन्यात आक्रामक फलंदाजी केली. विराटने बांगलादेशाच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. विराटने तब्बल 3 वर्षानंतर वनडे सामन्यात शतक जडलं आहे. मात्र यावेळी विराट कोहलीची एका वेगळ्याच कारणाने चर्चा होताना दिसतय. फलंदाजी सुरु असताना विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी रागाच्या भरात तो शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) वेडवाकडं बोलला देखील.
बांगलादेश आणि भारत यांच्यातील तिसरी वनडे चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळली गेली. या सामन्यामध्ये बांगलादेश टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची कामगिरी चांगली झाली. सामन्यादरम्यान विराट चांगलाच चिडलेला दिसत होता.
भारतीय टीमच्या डावाच्या 20 ओव्हरमध्ये इशान किशन स्ट्राईक एंडला फलंदाजी करत होता आणि विराट दुसऱ्या एंडला उभा होता. या ओव्हरमध्ये मेहदी हसन गोलंदाजी करायला आला. मेहदीने टाकलेल्या बॉलवर इशानने पुल शॉट मारला. यावेळी बॉल शाकीबकडे गेला. शाकिबने डाईव्ह मारत कॅच घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून तो कॅच सुटला.
shabil al hasan dropped the catch #ishankishan #Viratkohli pic.twitter.com/YCmxZuYUeN
— Adnan Ansari (@AdnanAn71861809) December 10, 2022
मुळात कॅच सुटला हे शाकीबला स्पष्टपणे माहीत होतं पण त्याने ते स्वीकारलं नाही. कर्णधाराने त्याचा रिव्ह्यू मागवला आणि नंतर शकिबच्या हातातून बॉल निसटल्याचं दिसून आलं. यानंतर अंपायरने नाबात असल्याचा इशारा केला. दरम्यान शाकिबचं हे कृत्य पाहून विराटला राग आला आणि तो त्याला उलट-सुलट बोलताना कॅमेरात कैद झाला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
टीम इंडियाचा स्टार आणि युवा फलंदाज ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत द्विशतक ठोकले आहे. ईशानने 131 बॉलमध्ये हे द्विशतक मारले आहे. ही मोठी खेळी करून त्याने टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बांगलादेश (bangladesh) विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (ishan kishan) द्विशतक ठोकलं. या खेळीत त्याने 24 फोर आणि 10 सिक्स मारले आहेत. त्याच्या या खेळीने टीम इंडिया सर्वांच्च धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे.
सामन्यातील शतकानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटने 72 शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये 72 शतक ठोकणारा विराट आता दुसरा खेळाडू बनला आहे. विराटने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉटिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड मोडला. रिकीने त्याच्या कारकीर्दीत 71 शतक ठोकले होते. त्यानंतर या सामन्यात शतक ठोकत कोहलीने विराट (Virat Kohli Breaks Ricky Ponting’s Centuries Record) कामगिरी केली.