LIVE : रोहितपाठोपाठ विराटचीही सेंच्युरी

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनंही सेंच्युरी झळकावली आहे.

Updated: Oct 29, 2017, 04:44 PM IST
LIVE : रोहितपाठोपाठ विराटचीही सेंच्युरी title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनंही सेंच्युरी झळकावली आहे. विराट कोहलीची वनडे कारकिर्दीमधली ही 32वी सेंच्युरी आहे. त्याआधी रोहित शर्मा वनडेमधली 15वी सेंच्युरी पूर्ण करून आऊट झाला. रोहितनं 138 बॉल्समध्ये 147 रन्स केल्या. रोहितच्या या इनिंगमध्ये 18 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

रोहित आणि विराटच्या सेंच्युरीमुळे भारत तिसऱ्या वनडेमध्ये मजबूत स्थितीत पोहोचला आहे. 45 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 3 विकेटच्या मोबदल्यात 285च्या पार गेला आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून न्यूझीलंडनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. 29 रन्सवरच भारताला पहिला धक्का बसला. शिखर धवन 14 रन्स करून माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला.

मुंबईमधली पहिली वनडे गमावल्यानंतर भारतानं पुण्यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये कमबॅक केलं. कानपूरमध्ये होत असलेली ही सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वनडे आहे. त्यामुळे ही मॅच जो जिंकेल तो सीरिजवरही कब्जा करेल.