LIVE : रोहित शर्माच्या सेंच्युरीनंतर भारत मजबूत स्थितीत

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Updated: Oct 29, 2017, 04:01 PM IST
LIVE : रोहित शर्माच्या सेंच्युरीनंतर भारत मजबूत स्थितीत  title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे 36 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 210च्या पार गेला आहे. रोहित शर्माची ही वनडेतली 15वी सेंच्युरी आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून न्यूझीलंडनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. 29 रन्सवरच भारताला पहिला धक्का बसला. शिखर धवन 14 रन्स करून माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. 

मुंबईमधली पहिली वनडे गमावल्यानंतर भारतानं पुण्यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये कमबॅक केलं. कानपूरमध्ये होत असलेली ही सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वनडे आहे. त्यामुळे ही मॅच जो जिंकेल तो सीरिजवरही कब्जा करेल. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा