मुंबई : सध्याच्या घडीला विराट कोहली हे केवळ नावच पुरेसं झालं आहे. केवळ भारतात नाही तर इतर देशांमध्येही विराटचे अनेक चाहते आहेत. मात्र विराटचा एक असाही पैलू आहे जो चाहत्यांना माहिती नाहीये. मुळात खुद्द विराटने याचा खुलासा केला आहे. रॉयल चँलेजर बंगळूरूने विराटचं पॉडकास्ट सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये विराटने, जेव्हा गोष्टी आपल्या बाजूने नसतात तेव्हा त्याच्याशी कसं डील करायचं याबाबत सांगितलं आहे.
यावेळी विराटला विचारलं की, फॅन्सने त्याच्या क्रिकेट करियरचा कोणता पैलू पाहिला नाहीये? यावर विराटने उत्तर दिलं की, "मी माझ्या बाजूला खडतर म्हणणार नाही. मात्र ती वेळ जेव्हा तुम्ही एका खोलीत आत्मविश्वासाविना बसले असता, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगला खेळ करण्याचा विश्वास नसतो. तसंच हे विचार दूर कसे करायचे याबाबत तुम्हाला कल्पना नसते."
कोहली पुढे म्हणाला, "जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा तुम्ही आपल्या अपेक्षांना कसं मॅनेज करायचं हा करियरचा सगळ्यात चॅलेंजिंग पॉईट असतो."
विराट कोहलीचा हा वाईट काळ 2014 मध्ये होता. ज्यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावर तो चांगला खेळ करू शकला नव्हता. सध्याच्या परिस्थितीत देखील तो अशात काही गोष्टींशी झुंजताना दिसतोय
Virat Kohli talks about how he overcomes pressure, how he manages when things aren’t going his way on the field and much more, on the #RCBPodcast powered by @KotakBankLtd.
Click on the link for the full episode: https://t.co/bixXHID9bQ#PlayBold #WeAreChallengers @imVkohli pic.twitter.com/cpyqRkyLlw
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 3, 2022
जेव्हा मला कोणता निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मी तो घेतो. मात्र तेव्हा लोकं त्यावर रिएक्ट करतात. मी गेल्या 7-8 वर्षांपासून खेळतोय. यावेळी लोकं म्हणतात की, मी प्रत्येक सामना खेळला पाहिजे. दिवसाच्या शेवटी मी लोकांना हे सांगू शकत नाही की, एक व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जातोय, असंही विराटने म्हटलंय.